दोन ओठांवर सांडलेला
दोन ओठांवर सांडलेला
तुझ्या आसवांचा मोती
हळूच मी टिपला सजने
माझ्या ओठांवरती
प्रेम हे फक्त गोड होत आधी
त्या दिवसा पासून त्याचा
खारेपणा सुद्धा साठला
माझ्या हृदयाशी………..
फुलोरा
आयुषाच्या प्रत्येक पायरीवर तुझ्या सोबतीने
उभा केलाय हा विश्वासाचा रेशमी डोलारा
कधी भावनांचा उन्माद ,कधी शांत दीप ज्योती
कधी गुंफलेले सुवासिक विचार , कधी वावटळ गारा
कधी एक एक गळणारे मनातले हिरवे पिवळे पान
कधी मनाच्या हिरव्याकंच गालीच्यावर पाउस धारा
नागमोडी वळनावरचा प्रवास हा वेगळा सारा
तुझ्या छोट्याश्या स्पर्शाने फुलतो हा स्नेहबंध फुलोरा.
पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात
’प्रशांत’नं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि ’क्रांती”ला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. ’क्रांती’ने तिची साखळी जोडून पुढचा डाव ’प्राजू’,’राघव’,’जयवी’ आणि माझ्या (’गोळे काका’ यांच्या) हाती तिची सूत्रे दिली.
मी माझी साखळी जोडून, आशा जोगळेकर आणि तुषार जोशी यांना खो देत आहे.
पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?
तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, “पाऊस-कविता” पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -
१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही.
आता फक्त पाऊस-कविता….
मग करायची सुरुवात?
प्रशांतचे कडवं – (भुजंगप्रयात छंद)
न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब
प्रशाआंतचा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना
क्रांतीचे उत्तर, छंद तोच, भुजंगप्रयात
खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?
गोळे काकांचे उत्तर, छंद तोच. भुजंगप्रयात!
नको पावसा कोसळू तू असा रे
किती घोर लावून जाशी असा रे
पुरे जाहले, ने पुढे सर्व वारे
जरा राजसा थांब आता कसा रे
.तुषार चे उत्तर छंद भुजंग प्रयात्
कुणी पावसाला म्हणे येत जारे
कुणाला सरीने सजण आठवे रे
कुणी गातसे पावसा थांब आता
अशी पावसाची अनोखीच गाथा
तुषार चा खो सई, चैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना.
माझे उत्तर. छंद तोच भुजंग प्रयात
सख्या पावसा तू असा रे कसा रे
तुला साथ देती हे उन्मत्त वारे
कधी ध्वस्त करशी जगाचा पसारा
कधी वर्षसी अमृताच्याच धारा ।
माझा खो चैताली,महक आणि शामली ला
महक चे उत्तर
कसे आवरू मी , या पाउस वेड्या मनाला
ओल्या मातीचा गंध मोहवतो त्याला
जीव कंठश्च होई,वाट पाहे क्षणा क्षणाला
लवकर येण्याचा निरोप दे, माझिया साजणाला.
shyamali che uttar
कधी सांग आता पुन्हा भेट व्हावी
तुझ्या चाहुलींनी धराही हसावी
पुन्हा त्या सयींची नको साथ आता
नको श्रावणाची बघू वाट आता
me konala kho deu?:)
http://asha-joglekar.blogspot.com/2010/09/blog-post.html
asha tai aani prashant ,khup surekh prayas,mala sandhi dilya baddal dhanyawad,ajun konala hyachyat kadwe jodayache asel tar swagat aahe.
ती तुझीच प्रीत होती
इवल्याश्या पानावर ओघळला मोती
चंद्रकला उमलल्या पूनवेच्या राती
स्वर्ण अप्सरा जशी अवतरली ती
ओळखले मी, ती तुझीच प्रीत होती
का निरभ्र आकाशातुन बरसले पाणी

का निरभ्र आकाशातुन बरसले पाणी
का रीती होऊन मनाची घागर वाही ओथम्बुनि
टवटवीत फुला सारखा हसरा दिवस आला
तरीही का वाटे उगाच उदास मनाला
इतके तरल स्वर आजूबाजूला
तरीही त्याला हवी कोणाची चाहूल ?
निश्चल ते , पुढे सरकेना
उचलण्या जड झाले रे पाउल…..
वाळूच्या कणां वरुन
वाळूच्या कणां वरुन पाय फिरवावेसे वाटले
बोटांच्या पेरांनी रेघा माराव्या उभ्या आडव्या
लाटेचा स्पर्श पुन्हा एकदा अनुभवावा
शन्ख शीपले ओंजळीत जमा करावे
खोपे करून रेतीत पाय लपवावे
पाण्यावर हेलकावनार्या होड्या
पांढरे शुभ्र बगळे, त्यांचे थवे उडवावे
क्षितीजा वर सूर्यबिम्ब पहावे
समिराचे गुन्जन ,मनात साठवावे
असे एकदा समुद्र किनारी एकटेच रहावे
कोणी सुद्धा नको हाका मारणारे
अगदी तू पण…..
नोव्हेंबर 29, 2011





