इंद्रधनू

Posted On डिसेंबर 26, 2007

Filed under इंद्रधनू
लेबले (टॅग्ज): , , , , ,

Comments Dropped leave a response

इंद्रधनू

थेंब थेंब पाउस येऊन गेल्यावर,आकाशात एक सुंदर कमान दिसते.
सात रंगांची,सप्त सुरांची,सात पावलांची,सात रेघाची
क्षितीजाच्या या टोका पासून दुसर्žया टोका पर्यंत.अस वाटत
चालत राहावे ,प्रत्येक रंगावर पाउल ठेवावे.सगळ्या
रंगात मिसळून जावे,सगळे रंग घेऊन यावे.

येऊन गेली ती वर्षा सजनी
हर्षित झाली सारी अवनी
हिरवी साडी लेऊन आली
भेट फुलांची देऊन गेली

पाहून ती सजलेली धरती
नभ पण उत्तेजित झाले
त्याच्या कुपितले मग त्याने
क्षितीजावर सात रंग उधळले

सात रंग एकत्र आले
त्याचे मग इंद्रधनू झाले
लखलखती रवीची किरणे
नभात सप्त दीप उजळले.

सप्त रंगाची कमान पाहून
मी पण हरखुन गेले
त्याचा सुंदर रंगांनी
माझे मन मोहित केले

इंद्रधनू वर पाय ठेऊनी
त्याच्या रंगात मी मिसळले
नाते असेच अतूट रहावे
प्रेमाच्या रंगांचे जाळे विनले.

Respond now.