तू बोलकी अबोली.
अबोली
आज खूप दिवसानी बागेतले अबोलीचे रोपटे पाहीले.तसे रोज़च पहाते.
पण आज ज़ॅरा निरखून,जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.हलकी शेंद्री,की हलकी गुलाबी रंगाची
नाजूक फुले,की त्यांचा रंगच अबोली आहे.कुणी ठेवल तुझ नाव अबोली,ती तर किती बोलकी,हसरी,
टवटवीत होती.
मंद समीरा संगे हलते,झुलते, डॉलते
मंद स्मित करते,तू बोलकी अबोली.
कोणच्या ऋतुत सखी तू उमलतेस
की सदैव बहरतेस,तू बोलकी अबोली.
हलका शेंद्री,की गुलाबी,का अबोलीच
कोणता रंग तुझा, तू बोलकी अबोली
तू मज संगती,हितगुज करीसी किती
अबोल कोण म्हणे,तू बोलकी अबोली.
सुगंध जरी मोहक नाही तुज पाशी
तू मनास भावते,तू बोलकी अबोली
नाजूक फुले माझी,आहे ’चांदणी‘ जशी
प्रसन्न चित्त करते,तू बोलकी अबोली.
डिसेंबर 29, 2007