नवे वर्ष नवे पर्व
डिसेंबर 30, 2007
Filed under नवे वर्ष नवे पर्व
लेबले (टॅग्ज): aasha, नवे वर्ष, नवे वर्ष नवे पर्व, duan, marathi kavita, mehek, nabh, new year, smita
नवे वर्ष नवे पर्व
नवीन वर्ष आले,जसा नवा ऋतू येतो
उल्हासित मनाने त्याचे स्वागत करतो
जल्लोष,हास्य,एका क्षणाची मस्ती
स्मित रेषा अनेक ओठांवर उमलती
नव्या वर्षाची मग नवीन चाल
नवेच सूर आणि नवीनच ताल
जुने मनाचे मळभ विळखे सोडून दिले
नवे रेशम बंध अपूल्या सोबत आणले
नव्या वर्षा साठी करते नवी आशा
नवे क्षितीज शोधती नवी दिशा
सफल होई तव प्रयत्न करत राहीन
नवीन उडान मी घेऊन पाहीन
पार करेन तो अखंड सरोवर
पोहोचून दाखविण उंच शिखरावर
उधळली सुरेख फुलांची रांगोळी
जगमगते दीप घाले मनास मोहिनी
सर्वांशी स्नेह बंध आपण जोडावे
द्वेश ,क्लेश,राग ,लोभ मनातून सोडावे
नात्यां मधे निर्माण करावा स्वर्ग
नवीन वर्षात सुरू करावे नवे पर्व.