पारंब्या

पारंब्या

वर्षा नु वर्षे
उभे आहे वृक्ष
किती ऋतू बदलले
किती शतके आली गेली
किती स्वभाव किती गुण
किती पर्व त्याने पाहिली
नुसता चेहरा पाहून
ओळखतो व्यक्ती

उदंड घेर,उंच मान
विशाल काया जशी
मोठे मन पण त्याचे
किती वाटसरूंना त्याच्या खाली
शांत,तृप्त विश्रांती मिळाली
कोपलेल्या उन्हा मध्ये
मायेची कूस मिळाली
ममता जशी

 पौर्णिमेला
सुवसिणी सार्‍या जणी
पुजति त्यासी
गुंडाळून रेशम बंध
एक वर मागती त्याला
साता जन्माचा माझा सखा
सुखरूप राहू दे
ही संगत अशीच
सर्व जन्मी असु दे
कृपा तुझी

प्रत्येकाच्या आशा
सपूर्ण करते जसे
प्रत्येक आशा पारंबी होते
जमिनीत परत मूळ धरते
नवीन पल्लवी घेऊन येते
लहान मुळे झुलतात
परंब्यांना धरून खेळतात
खूप हर्षित होते
हसते, वार्‍या संगे डॉते
निरागस भासते.

सर्वांचे हित पहाते
खरे सोबती जसे.

2 Responses to “ पारंब्या ”

  1. tulipsintwilght

    khupp chaan

  2. mehhekk

    aabhari aahe

Respond now.