मृगत्रिष्णा
January 9, 2008
Filed under मृगत्रिष्णा
Tags: मृगत्रिष्णा, chandani, marathi kavita, mehek, mehhekk, mrugtrishna, nabh, navin aas, oasis, reti, umed, valu, valvant
मृगत्रिष्णा
वाळवंट अखंड अखंड कधी न संपणारे
असेच भासते जीवन कधी न कधी तरी
वावटळ प्रचंड प्रचंड कधी न झेपणारे
शमत नाही कितीही प्रयत्न केले जरी.
रेतिचे बारिक कन उडतच रहातात
हातावर,पायावर,ओठांवर,नयनी
चिकटून बिलगुन बसायला पाहतात
कोलाहल उठावतात छोट्याश्या मनी
बळ एकवटून वादळाचा सामना करावा
आपली दिशा कुठली याचा विचार असावा
कधी रेतीच्याच डोंगराचा निवारा घ्यावा
नवी उमेद दाखवतो जरासाही विसावा
चालत राहावे पुढे पुढे मनात घेऊन आस
पाउस पडेल वाळूवर, स्वप्न घेऊन उरात
कुठे न कुठे भेटेल ते मृगत्रिष्ण हिरवे
नवीन पहाट होईल जीवन रूपी नभात.