प्रेम सागरात् भीजलेत् सगळे

Posted On जानेवारी 16, 2008

Filed under प्रेम सागरात्
लेबले (टॅग्ज): , , , , , , , , ,

Comments Dropped one response

प्रेम सागरात् भीजलेत् सगळे
तरी  म्हणती   प्रेमास  अंधळे
पा ठेवा जपूनी जरा तुम्ही
उघडे  असुदेत  सतत  ते डोळे

प्रेमात स्वतः ला विसरून जाणे
फक्त दुसर्‍या  साठी  मग  जिणे
जेव्हा थम्बुन वाहते घागर
एक मेकांचे नंतर मोजति उणे 

कोणावर प्रेम करण्या पूरवी
आधी स्वतः वर प्रेम करावे
ह्याच सुंदर गुलाब पुष्पानी
दुसरे  हृदय  सुद्धा   भरावे

प्रेमाचे गीत हे असे असावे
दोन्ही नयनी सारखे दिसावे
प्रेमाचे रांग कितीही ले
तरीही  ते  ओंजळीत  उरावे

प्रेम हे  एकमेकांना अर्पण
प्रेमाचे दुसरे नाव समर्पण
नुसते पाहून मनी ओळखावे
प्रेमाचा पारदर्शक हा दर्पण

कधी प्रेम उमलते बहरते
कधी अगणित प्रतीशा हाते
दोघाच्या वाटा मिळाल्या ठीक
नाही तर ते हृदयात रहाते.

One Response to “ प्रेम सागरात् भीजलेत् सगळे ”

  1. PRASAD

    is true and very very sweet

Respond now.