घरटे बांधले तुला
February 21, 2008
Filed under घरटे बांधले तुला
Tags: aapali manasa, chamani, chandani, ghar, gharte bandhale, jhivhala, marathi kavita, mehek, mehhekk, nabh, prem

घरटे बांधले तुला
इवलसा चिमना जीव कुठे ग लपला
माझ्या अंगानातला चिवचिवाट कुठे हरवला ?
पुर्वी असायची किती लगबग,किलबिल
चिमनी आणि चिमन जोडीने बसायचे
चालायची थोडी कुजबुज,थोडे प्रेमाचे हितगुज
कधी आपसात कधी माझ्याकडे पाहून हसायचे
झाले तुझे काम,दाणा नाही ठेवलस अजुन
म्हणून विचारायचे ,लटकेच रागवायचे
दाण्याचा नाश्ता करून जायाच असायच
दिवसभर फिरून काम करायाच
लहानसे तिनके,काड्या,कापुस आणून
स्वतःच टुमदार घरट वीणायच
वेळ आली की अंडी उबवायची,पिल्ल निघायची
किती उब होती न तुझ्या घरट्यात,प्रेमाची,मायेची.
त्यातली थोडी उब मला सुद्धा मिळायची
किती गर्व होता तुला पिल्लानवर
सुरेख आहेत म्हणून शंभरदा सागायचिस
मला लागल खुपल तर विचारपूस करायचिस
अगदी आपल्या माणसा सारखी काळजी
दिसायची न मला तुझ्या डोळ्यात,हावभावात
अगदी जिव्हाळ्याच नात होत,तुझ,माझ आणि पिल्लान्च
सुख दुख आपल होत न अगदी एका घरच
मग आता ग काय झाल,कुठे बिनसल
माझ मायेच पाखरू कुठे अचानक उडाल ?
असताव्यस्त झालय घरट,रिकाम झालय माझ घर
निरव शांतता,काळजात रुतनारी
खोल वर भेदलय मनाला असा बोचरा शुकशूकाट
परत हवाय मला तो ओलावा,तो गोंधळ
माझ्यावर तुझ्या प्रश्नांचा मारा पोरखळ
आपला तो चिव चिवाट संवाद अवखळ
अशी नको रसुस ग बाई,नाही रागवनार तुला कधी
परत ये,परत उमलुदे तुझी माझी प्रीती
बघ न मी तुझ्या साठी घरट बान्धलय
काड्याच नाही पण लाकडाच,मउ कापुस ठेवलाय
तुझ्या आवडीचे दाणे, पाणी सुद्धा ठेवलय
स्वागता साठी रांगोळीने आंगण पण सजवलय
आपल्या नात्याचा रेशम बंध बांधलाय
डोळे लागले आकाशी,शपथ माझी,तू नक्की ये
प्रेमाचे पिवळे पान पुनष्प हिरवे होऊ दे
तुझे माझे ऋणानुबंध जनमो जन्मी राहू दे.
किती तन्मयता,किती आस्था,किती ते प्रेम,किती ती ओढ,किती ती जीव घेणी याद,किती ती चुकीची कबूली,किती ती भविष्यातली आशा.
खरंच चिमनी,चिमन एव्हडे समजून उमजून वागले,तर काय लागली आह कोणाची बिशाद अशी संसाराला दृष्ट लागायला.
मला वाटतं चिमन बरेच वेळां रागावत असतो.चिमनीला निसर्गाने खूप सोशिकता दिली असते.
माझ्या मनात पाल चुकवुकते कुठे आपल्या पिलांसाठी आणि चिमनसाठी दाणा आणायला गेली असतां,
एखाद्दया मेल्या पारध्याने वेळ तर साधाली नाही नां?
इडा पिडा टळो
कविता फारच भावली.
श्रीकृष्ण सामंत
Shrikrishnas@gmail.com
Kharach Hya Kavitet Nisargane Dililya sarv Bhavana Vyakt Hotat
aplyala kavita aavadli,hyatch mala sagale milale,khup khup aabhari aahe mi apali,dhanyawad.
“परत हवाय मला तो ओलावा,तो गोंधळ
माझ्यावर तुझ्या प्रश्नांचा मारा पोरखळ
आपला तो चिव चिवाट संवाद अवखळ” …… छान कविता, फार आवडली !
satish ji,thanks ,kavita aavadli aplyala,dhanyawad.