अंकुर
अंकुरकाळ्या सुगंधी मातीत एक बीज पेरल होत
नीट रुजल की नाही म्हणून रोज पाहील होतप्रेमाच खत,विश्वासच पाणी घालून सिंचन केल
वार्या च्या झोन्झावाताणे उघड पडू नये म्हणून आत्मियतेच,जिव्हाळ्याच आजु बाजूला कुंपण केल
माझ्या आकांक्षा पण रूजवल्या होत्या त्याच्या सोबत इवलस तान्हूल जिवापाड जपल,अगदी आपलस झाल
ते सुद्धा हट्टाने जगल,माझ्या मायेच चीज़ केल कोंब फूटलय,छोटस अंकुर उमल तय बिजावर
पहिल हिरवेगार लुसलुशित मुलायम पान एखाद्या राजसी मुकुटा वरच्या तुर्या सारख डौलदार
किती दिमाखात उभ होत या जगा समोर रोज़ एक एक पान आकार घेत होत
स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होत माझ्या आशा त्याच्या सोबर पल्लवित होत होत्या
त्या अंकुरा सोबत माझ्या मनातल अंकुर तग धरतय पण माझ खूळचट मन उगाच कश्या साठी घाबरतय ?
माझ रोपट उध्या जेव्हा मोठ होईल कदाचित मी त्याच्या पासून दूर जाईल
कोणी त्याच्या वरची पान ओरबाडनार नाही ना ? त्याला इज़ा करून दुखावणार तर नाही ना ?
उमलु देतील का फूल,होउ देतील त्याची फळ ? तेव्हा ते दुसर्याणा सुद्धा आधार देईल
त्याच्या फळा तून बिया पडून अजुन नवीन अंकुर येतील या सजीव सृष्टी साठी गरज आहे त्याची
त्याच्या मुळेच इथे नव जीवन दिसले स्त्रीत्वाच्या बिजाला कधी का होईना न्याय मिळेल ?
मार्च 3, 2008