रंगात रंगले

Posted On मार्च 20, 2008

Filed under रंगात रंगले
लेबले (टॅग्ज): , , , , , , , , ,

Comments Dropped leave a response

रंगात रंगले

ढोल ताशे मृदंग वाजती
नभ प्रेमाचे रंग उधळती
मन त्यात  भिजुनी गेले आज 
ये रे कान्हा राधा छेड़े साज़.

लपु नकोस बघ गोपिका जमल्या
वाट पाहती  कधि कान्हा मारे पिचकारी
रंगून घ्यायचे तूझीया रंगात
ये रे कान्हा राधा छेड़े साज़.

झाले तुझी अर्पण भक्ति
नको विचारूस आनखिन काही
मिच राधा,मिच मीरा रे तुझी दीवानी
सामाउंन घे कमल चरनात
ये रे कान्हा राधा छेड़े साज़
की होली आली नंदवनात

Respond now.