कॅक्टस

कॅक्टस 

का म्हणतसी आयुष्यात सदैव गुलाबच असावे 
कधी तरी वळून दुसर्या बाजूस कॅक्टस पण पहावे 

विविध रंगांनी नटलेल्या गुलाबाचे देठ काटेरी असते 
वाळवंटात उगवलेले एक हिरवे काटेरी कॅक्टस  पण मोहक दिसते 

गुलाब मनास भावते,पण खत पाणी सुद्धा घालावे लागते 
कॅक्टस स्वतः मधे पाणी साठउन तांहन्ल्या जिवास सुद्धा देते 

गुलाबाचे रोपटे कसे पदो पदी बहरते 
उशिरा का होईना,कॅक्टस वर सुंदर दुर्मिळ फूल  उमलते

सुख आणि दुख दोघांचे समान स्वागत करावे 
गुलाबा सोबत जीवनात कॅक्टस चे स्थान राहावे 

दोघांच्या सहवासात राहून खूप काही शिकावे 
आपल्या कुपितले विद्या दान सर्वाना पुरूनु उरावे.

2 Responses to “ कॅक्टस ”

  1. कविता

    आपला ब्लॉग फ़ार सुंदर आहे आणि यातील कविताही छान आहेत

  2. mehhekk

    kavita aapli khup aabhari aahe.thanks

Respond now.