नभ आज दारी आले

Posted On ऑक्टोबर 2, 2008

Filed under नभ आज दारी आले
लेबले (टॅग्ज): , , ,

Comments Dropped 6 responses

नभ आज दारी आले

वेड्या मनास कोण समजावी
उंच उडाले निळ्या आकाशी
सोडून मला एकटेच भरकटले
कदाचित मग थोडे घाबरले
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.

सांगून ते एकते कोणाचे
विचार मांडते सतत स्वतःचे
कितीही त्यास जखडून ठेवा
पण ते पळते , हरवते
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.

जाणत नाही जगाची रीत
मिसळून राहणे हीच प्रित
एकटेच ते गुंगते , रमते
आकाश दुलईत दडपुन जाते
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.

6 Responses to “ नभ आज दारी आले ”

  1. Asha Joglekar

    मनाला परतीची वाट दाखविण्या नभ आज दारी आले.
    सुंदर कल्पना.

  2. mehek

    dhanyawad aasha ji

  3. वाचून बघा

    “वेड्या मनास कोण समजावी
    उंच उडाले निळ्या आकाशी
    सोडून मला एकटेच भरकटले
    कदाचित मग थोडे घाबरले” …. सुरेख कविता , सुंदर कल्पना !

  4. mehhekk

    dhanyawad satishji

  5. shrikrishnasamant

    कविता फारच आवडली.”नभ आज माझ्या दारी आले” ही कल्प्नाच सुंदर वाटते.

  6. mehek

    thanks samant kaka

Respond now.