
वाळूत पाय ठेविता , तो गार स्पर्श झाला
मना मधे कुठे तरी , भावनेला पूर आला
ते क्षण शन्ख शिंपल्यां चे विखुरले इथेच
वेचताना लाटेनी पांघरला आठवणींचा दुशाला
भरतीची रात्र होती , पुनवेचा चंद्र होता
सागरा वर सांडला प्रित चांदण्यांचा प्याला
मागेच धावते वार्या च्या उलट दिशेला
ओहोटीची वेळ आता कशी समजाउ मनाला
जर भरतीची वेळ होती… तर … ओहोटीची वेळ आता कशी समजाउ मनाला … हे नाही कळल … पण कविता छानच आहे हे नक्की …
http://asachkahitari.wordpress.com/