चंद्रच पहीले लाजला.
जानेवारी 2, 2008
Filed under असच सुचलेल
लेबले (टॅग्ज): चंद्रच पहीले लाजला., chandra, jeevan, marathi kavita, mehek, mehhekk, nabh, shikhar
1.आयुष्याच्या पाय र्या चढ़तांना,सर्व नाते सोबत घ्यावे
नाही तर उंच शिखरावर गेल्यावर,लागेल एकटेच राहावे.
2.चन्द्र आहेस तू , अशी उपमा नको देउस कधी मजला
माझ्या एवजी दरवेळी नभातला चंद्रच पहीले लाजला.
प्रीतीचा वारसा.
डिसेंबर 29, 2007
Filed under असच सुचलेल
लेबले (टॅग्ज): प्रीतीचा वारसा., chandani, marathi kavita, mehek, mehhekk, nabh, prem, prit, sagar
1.किती वाट पाहु,गेलास जसा,कधी येशील तू सजना
तुझ्या वाचून मी एकटी,कसा नेऊ पुढे प्रीतीचा वारसा.
2.शब्दात शब्द मोत्यांची माळ कितीही गुंफली जरी
तुझ्या एका प्रेमळ शब्दाची सर,नाही येणार तरी
3.संध्याकाळी घरा घरात अनेक लख लखते दीपक उजळले
तुला शोधण्या साठी मी,दिव्या खालच्या अंधरा कडेच वळले
4. तू प्रेमाचा अथांग सागर,तुला भेटण्या साठी गर्भात मी उतरले
भरतिच्या लहरींनी त्या शिपलिस एकटीच किनारी फेकले.
असच सुचलेल
डिसेंबर 27, 2007
Filed under असच सुचलेल
लेबले (टॅग्ज): असच सुचलेल, chandani, ghagar, marathi kavita, mehek, mehhekk, sahaj suchlel, sahanshakti
असच सुचलेल
1. सहनशक्तीची दोरी जेव्हा खूप ताणली जाते
डोळ्यातल्या पाण्याने मग जीवनाची घागर भरली जाते.
2. असंख्य रस्ते,असंख्य वाटा,माझी कोणती त्यातली
बिथरले मन,छोटीशी पाउलवाट मग त्याने जवळ घेतली.

