घरटे बांधले तुला

Posted On फेब्रुवारी 21, 2008

Filed under घरटे बांधले तुला
लेबले (टॅग्ज): , , , , , , , , , ,

Comments Dropped 5 responses

घरटे बांधले तुला

इवलसा चिमना जीव कुठे  लपला
माझ्या अंगानातला चिवचिवाट कुठे हरवला ?
पुर्वी असायची किती लगबग,किलबिल
चिमनी आणि चिमन जोडीने बसायचे
चालायची थोडी कुजबुज,थोडे प्रेमाचे हितगुज
कधी आपसात कधी माझ्याकडे पाहून हसायचे
झाले तुझे काम,दाणा नाही ठेवलस अजुन
म्हणून विचारायचे ,लटके रागवायचे

दाण्याचा नाश्ता करून जायाच असायच
दिवसभर फिरून काम करायाच
लहानसे तिनके,काड्या,कापुस आणून
स्वतः टुमदार घर वीणा
वेळ आली की अंडी उबवायची,पिल्ल निघायची
किती उब होती  तुझ्या घरट्यात,प्रेमाची,मायेची.
त्यातली थोडी उब मला सुद्धा मिळायची

किती गर्व होता तुला पिल्लानवर
सुरेख आहेत म्हणून शंभरदा सागायचिस
मला लागल खुपल तर विचारपूस करायचिस
अगदी आपल्या माणसा सारखी काळजी
दिसायची  मला तुझ्या डोळ्यात,हावभावात
अगदी जिव्हाळ्याच नात होत,तुझ,माझ आणि पिल्लान्च
सुख दुख आपल होत  अगदी एका घरच

मग आता  काय झाल,कुठे बिनस
माझ मायेच पाखरू कुठे अचानक डा ?
असताव्यस्त झा घर,रिकाम झा माझ घर
निरव शांतता,काळजात रुतनारी
खोल वर भेदलय मनाला असा बोचरा शुकशूका
परत हवाय मला तो ओलावा,तो गोंधळ
माझ्यावर  तुझ्या प्रश्नांचा मारा पोर
आपला तो चिव चिवाट संवाद  अव

अशी नको रसुस  बाई,नाही रागवनार तुला कधी
परत ये,परत उमलुदे तुझी माझी प्रीती
बघ  मी तुझ्या साठी घर बान्धलय
काड्या नाही पण लाकडाच, कापुस ठेवलाय
तुझ्या आवडीचे दाणे, पाणी सुद्धा ठेवलय
स्वागता साठी रांगोळीने आंगण पण सजवलय
आपल्या नात्याचा रेशम बंध बांधला
डोळे लागले आकाशी,शपथ माझी,तू नक्की ये
प्रेमाचे पिवळे  पापुनष्प हिरवे होऊ दे
तुझे माझे णानुबंध जनमो जन्मी राहू दे.