चांदण्यात मी भीजले

चांदण्यात मी भीजले

पोर्णिमेच्या रात्रीगोल गोल चंद्रमा हसरातो मंद सुगंधी वारा,खळखलणारा झरा,
प्रवाहत उतरलेली चंद्र किरणे,चांदण्यांचा शिपलेला सडा,काळ्या जर्द साडी वर 
शुभ्र चमकणारे मोती लाउन आलेली निशाराणी,अशी सुंदर नटलेली रात्र,
चंद्र-चांदणीच प्रतिबिंब र्‍या,,खूप हवी हवीशी वाटे मजला
एकटक पाहते मी त्याला,तो ला,चंद्र तो गाला लाजला.

किती दिवस झाले,दिवस म्हणण्या पेक्षा किती रात्री उलटल्या,आकाशातल्या शुभ्र
चांदन्यान कडे पाहून,चंद्रच्या नज़रेशी ज़र लाउन.

चंदेरी किरणांच्या रूपेरी वाटेवरून
आज मी पुन्हा  नभात उतरले
मनातले गुपित चंद्रास सांगून
त्या शुभ्र चांदण्यात मी भीजले.

चंद्र सजना मज चोरून पाहता
गालातल्या गालात मी हसले
फुलले,बहरले आज मी लाज़ले
त्या शुभ्र चांदण्यात मी भीजले.