जुन्या वस्तीवर कोसळणारा भीजलेला पाउस

काल भेटला वाटेत
जुन्या वस्तीवर कोसळणारा
भीजलेला पाउस
तुडुंब नखशिखात
चिखलाने माखलेला
ओढ्या नाल्यान मध्ये लोळून
थुई थुई नाचलेला
चार – सहा शेन्दरट टार्गटाना
घेऊन गल्ली बोळातून ओरडत नाचलेला
फाटक्या कागदाच्या होडीत बसून
प्रवासाने थक्लेला
पायात शेवाळ गाठी
त्या सोडवण्यात गुंतलेला
गढूळ पाण्यातून वाट काढत
माझ्या मनी बिलगलेला,अंगाला बुरकट वास असलेला
खूप जपून ठेवलाय मी
त्याच्या अधरातून
मोत्याचा मणी हसलेला.