मोगरा
कधीतरी हळूच दारात मोगरा फुलतो
सुगंध त्याचा मनाच्या कोपर्यात दरवळतो
असे सुगंधित क्षण कधीच सुकु नयेत जीवनात…
भावनांचा झरा

भावनांचा झरा झुळ झुळ वाहतोय
कुणाच्या तरी हृदयाचा ठोका पडावा त्यात
प्रेमाचे उठलेले तुषार, मनास चिंब चिंब भीजवतील
.
पहिल्या प्रहरिचा दव बिंदू
माझे मी स्वतः ला शोधतोय
धुंध धुक्याच्या घनिष्ट जाळ्यात
पहिल्या प्रहरिचा दव बिंदू, सोनेरी किरण म्हणाली…
त्रिवेणी-पांढर.शुभ्र नात आपल
त्रिवेणी
१. पांढर.शुभ्र नात आपल निर्मल दुधा सारख
मृदुता समजूतदार पणा मुलायम मलई सारख
जरा जास्त तापल एकदा आणि उतू गेल..
२ जखम खूप खोल गडलिये,जिव्हारी रूतलीये
महागड्या औषधांचा सुद्धा काही परिणाम नाहिये
फक्त तुझ्या प्रेमाची एक फुंकर हवी होती……
त्रिवेणी – मॉडर्न आयुष्य
डिसेंबर 31, 2007
Filed under त्रिवेणी
लेबले (टॅग्ज): तीन ओळी, त्रिवेणी - मॉडर्न आयु, chandani, marathi kavita, mehek, mehhekk, nabh
1.आयुष्य कस एकदम मॉडर्न झालय , पळतच राहायच
सुखी सोयीनी युक्त जीवनासाठी पैसा कमावत राहायच
अरे पण शांत घटीकेत श्वास घायला वेळ काढ़शिल कधी.
2.खूप दिवसांनी मजला आज विठोबा रखमाई भेटले
देवा तुम्ही तर हृदयात रहाता ,असे कुठे निघाले
हृदयात लोभ राहतो आता,आम्ही मंदिरातच बरे.
3.या जमान्यात मोबाइल फोनची नुसती भरभराट
सतत नवीन रिगटोन्स चा होते रिंग रिंग त्यात
सकाळच्या प्रहरि हरवलाय पक्ष्यांचा किलबिलाट.
4. काळा सोबत चेह र्या वरचे मुखवटे सुधा बदलले
होते नव्हते सगळे गुण आवगुण अंगावर घातले
कृत्रीमतेत गालावर येणारे खुद्कन हसू हरवले.
सप्टेंबर 9, 2009
एप्रिल 6, 2009

