नाताळ आला
नाताळ आला
गुलाबी थंडीचे दिवस,आणि मनात नाताळ म्हणजेच ख्रिसमस सणाचा आनंद.
लहानपनीचे दिवस आठवतात आज.सान्ताला भले मोठे पत्र लिहीणे,त्यात
मी कशी एकदम छान मुलगी आहे सांगणे,आई बाबांचे एकते,सगळ्याना मद्दत
करते.आणि मग आपल्याला हव्या असणार्या वस्तूंची यादी पण सांगने.
रात्री उशी खाली पायमोजा ठेवायचा आणि सान्ता कडून येणार्या भेटीची वाट पाहायची.
थंड प्रदेशात राहणार्या लोकांचा हेवा वाटायचा,कारण त्याना बर्फाचा मानव करता येतो,
बर्फाचा गोळा फेक खेळता येतो.
अजूनही काही सान्ताची ओढ कमी नाही झालेली.आता छोट्या मुलांच्या डोळ्यात शोधते त्याला.
बाकी सपूर्ण वर्ष काही चर्च मध्ये जाणे होत नाही,पण नाताळ च्या दिवशी आवर्जून जाते.
सगळे किती आनंदी असतात.ख्रिसमस केरोल्ज़ गाणे,येशू समोर मेणबत्ती लावणे.
त्या आखंड रोषणाईत यशुचा चेहरा मन प्रसन्न करून जातो.हृदयात एक नवी आशा निर्माण होते.
आपण केलेल्या चुकांची माफी आपोआप मागितली जाते.येशू खूप दयाळू आहे,माफ करतो लवकर.
ख्रिसमस साठी झाड सजवणे,रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई,भेटवस्तू,कीन कीन मंजुळ आवाज़
करणार्या बेल्स,केक,फराळ.सगळ आवडीच.
पुढच्या येणार्या दिवसात सौजन्याने,न रागवता,ह्सत राहण्याचा प्रयत्न करीन.जमेल तशी दुसर्याला
मद्दत करीन इतका प्रण नक्कीच करते मनात.
आला नाताळ सण,घेऊनी आनंद मनात
सर्व चुकांची माफी मागितली मनात
सर्वाना सुखी करावे हीच आशा उरात
मद्दत हाच धर्म,गाणे गावे सुरात.
डिसेंबर 24, 2007

