वाटतसे मजला झुळुक व्हावे
फेब्रुवारी 4, 2008
Filed under वाटतसे मजला
लेबले (टॅग्ज): वाटतसे मजला, chandani, jhuluk, marathi kavita, mehek, mehhekk, nabh
वाटतसे मजला झुळुक व्हावे
मोकळ्या रानातून मुक्त फिरावे
उंच उंच बाबूंच्या बासरी वरती
अलगद काही सुरसाज़ छेडावे
कुणाची मग मला नाही भीती
भावनाची घागर करेन रीती
तोडून सारे बंधपाश जगाशी
स्वतःशी थोडी करेन प्रीती
हळूवार स्पर्श करीन कळीशी
गुपित सांगेन तिच्या मनिशी
सुगंध उसना घेऊन फुलाचा
दरवळत ठेवेनं माझ्या उराशि
गुलाबी गालांवर लट पहुडली
हलकेच मी उडविन तिजला
लाजून मिश्किल स्मित करशि
तिच्या संगती झुलवेन मजला
अशीच करावी एकटी भ्रमंती
पण लागेल मला विश्रांती
कुशीत मी तुझ्याच येऊन
हितगुज करेन प्रीतम तुझ्याशी.

