वाळूत पाय ठेविता

Posted On मार्च 27, 2009

Filed under वाळूत पाय ठेविता
लेबले (टॅग्ज):

Comments Dropped one response

वाळूत पाय ठेविता , तो गार स्पर्श झाला
मना मधे कुठे तरी , भावनेला पूर आला

ते क्षण शन्ख शिंपल्यां चे विखुरले इथेच
वेचताना लाटेनी पांघरला आठवणींचा दुशाला

भरतीची रात्र होती , पुनवेचा चंद्र होता
सागरा वर सांडला प्रित चांदण्यांचा प्याला

मागेच धावते वार्या च्या उलट दिशेला
ओहोटीची वेळ आता कशी समजाउ मनाला