का निरभ्र आकाशातुन बरसले पाणी

Posted On ऑक्टोबर 25, 2009

Filed under Uncategorized

Comments Dropped 2 responses

images

 

 

 

 

का निरभ्र आकाशातुन बरसले पाणी
का रीती होऊन मनाची घागर वाही ओथम्बुनि
टवटवीत फुला सारखा हसरा दिवस आला
तरीही का वाटे उगाच उदास मनाला
इतके तरल स्वर आजूबाजूला
तरीही त्याला हवी कोणाची चाहूल ?
निश्चल ते , पुढे सरकेना
उचलण्या जड झाले रे पाउल…..

वाळूच्या कणां वरुन

Posted On सप्टेंबर 28, 2009

Filed under Uncategorized
लेबले (टॅग्ज):

Comments Dropped one response

वाळूच्या कणां वरुन पाय फिरवावेसे वाटले
बोटांच्या पेरांनी रेघा माराव्या उभ्या आडव्या
लाटेचा स्पर्श पुन्हा एकदा अनुभवावा
शन्ख शीपले ओंजळीत जमा करावे
खोपे करून रेतीत पाय लपवावे
पाण्यावर हेलकावनार्‍या होड्या
पांढरे शुभ्र बगळे, त्यांचे थवे उडवावे
क्षितीजा वर सूर्यबिम्ब पहावे
समिराचे गुन्जन ,मनात साठवावे
असे एकदा समुद्र किनारी एकटेच रहावे
कोणी सुद्धा नको हाका मारणारे
अगदी तू पण…..images

सुचत काहीच नाहीये

Posted On सप्टेंबर 5, 2009

Filed under Uncategorized

Comments Dropped leave a response

सुचत काहीच नाहीये , फक्त कलम धरली हाती
अक्षरांचे मोती मांडले , पाहु गरंगळत कुठे नेतील

खुपदा विचार केला

Posted On ऑगस्ट 11, 2009

Filed under Uncategorized
लेबले (टॅग्ज):

Comments Dropped one response

खुपदा विचार केला,नाही येणार त्या वाटेनी
प्रत्येक वेळी आयुषा चे वळण त्याच वाटी वळले
मागे वळून न पाहण्याचा अनेकदा मनी ध्यास केला
प्रत्येक वेळी चक्षु बाण मागेच गेला

पाउस पाउस

Posted On जून 12, 2009

Filed under Uncategorized
लेबले (टॅग्ज): , , ,

Comments Dropped 2 responses

पाउस पाउस ओला चिंब ,रस्त्या च्या कडेला वाहतोय

टिप टिप मोत्यां सारखे थेंब गोळा करून राहतोय

माझी कागदाची नाव सोडली पाण्यात

पापनी लवण्या आधी दूर कुठे नेशी

इवल्या श्या मनास पहा न विन कारण सताव्तोय.

दोन आसव

Posted On मार्च 29, 2009

Filed under Uncategorized

Comments Dropped leave a response

दोन आसव फुलांवर सांडली
तीच फूल पुजेला देवा समोर मांडली

कधी कधी

Posted On ऑक्टोबर 26, 2008

Filed under Uncategorized

Comments Dropped 2 responses

कधी कधी मी जे ठरवते मनात आणि आनंदित होते ती गोष्ट होतच नाही.
साठवलेला क्षण जवळ येऊन हुलकावणी देऊन निघून सुद्धा जातो.अगदी
बाजूनि,अनोळखी असल्या सारखा.हाक मारली तर  पण देतो,बोलतो
हसतोविचारपूस करतो ,पण परक्या सारखा.तो क्षण का कधी सत्य नव्हता?
झुळझुळत्या वार्‍या सोबत अनेक नवीन क्षण फिरतात,पण त्यांच्याशी
माझी ओळख होऊन सुद्धा ते आपलेसे का नाही वाटत.मन म्हणत जे गेल
ते सोड आणि जे समोर आहे ते धर,पण या हृदयाला नाही समजत त्याची
परिभाषा.हृदय उलट्या दिशेने प्रवास करतय आणि मन सरळ.पण यातून
मी कोणाची बाजू घेऊ,मला नक्की माहीत आहे हृदय म्हणताय ते होणार नाही,
कधीच नाही.मन ज्या क्षणाची वाट पहातय तो येण्याची आशा तरी आहे.
बहुतेक हृदयाच्या गोष्टी बोलून दाखवाव्यत आणि मना प्रमाणे करावे हेच बरे.

कधीतरी

Posted On सप्टेंबर 3, 2008

Filed under Uncategorized

Comments Dropped one response

कधीतरी

आनंदी मोहक क्षणांचा पाउस पडतोय आसपास
सगळ्या सुख सोयी नातिगोती सम्रुधि भावे मना
मी रमते गमते ,हसते उल्हासित होते त्यांच्यात
कधीतरी का वाटते मी काही क्षण एकटे रहावे जगात….

रीझउन पाही

Posted On मे 3, 2008

Filed under Uncategorized
लेबले (टॅग्ज): , , , , , , , , , ,

Comments Dropped 5 responses

रीझउन पाही प्रियकर फुलास गोंजारून
प्रेम स्पर्शाने प्रत्येक पाकली जाई मोहउन 
भावनेच्या भरात आपले मधु रस देऊन बसले
माझ्या मन फुलपाखरास फक्त सुगंधाचे वेड