रात्रीच्या मखमली दुलईत

Posted On फेब्रुवारी 10, 2012

Filed under चारोळी, Uncategorized

Comments Dropped 3 responses

रात्रीच्या मखमली दुलईत
चंद्र तारे खेळले
पहाट होता सूर्य किरणांनी
मोत्यांचे दवबिंदू उधळले…..

Advertisements

कुठल्या क्षणात अडकले मन

Posted On नोव्हेंबर 29, 2011

Filed under चारोळी, Uncategorized

Comments Dropped leave a response


कुठल्या क्षणात अडकले मन न कळे
आठवणींच्या लाटाचा उन्माद उसळला
तू बाजूने गेलास अनोळखया सारखा
मलाच पाहीत तो क्षण मी कसा सांभाळला.

दोन ओठांवर सांडलेला

Posted On ऑक्टोबर 17, 2011

Filed under Uncategorized

Comments Dropped leave a response

दोन ओठांवर सांडलेला
तुझ्या आसवांचा मोती
हळूच मी टिपला सजने
माझ्या ओठांवरती
प्रेम हे फक्त गोड होत आधी
त्या दिवसा पासून त्याचा
खारेपणा सुद्धा साठला
माझ्या हृदयाशी………..

झोक्यावर झुलत होती

Posted On एप्रिल 15, 2011

Filed under चारोळी
टॅगस्: , , ,

Comments Dropped leave a response

झोक्यावर झुलत होती पाहीली
माझीच एक जुनीशी आठवण
जवळ जाउन निरखले तयासी
तुझ्या प्रेमपुष्पाचे प्रतिबिंब साठवण

फुलोरा

Posted On मार्च 6, 2011

Filed under Uncategorized
टॅगस्: , ,

Comments Dropped 2 responses

आयुषाच्या प्रत्येक पायरीवर तुझ्या सोबतीने
उभा केलाय हा विश्वासाचा रेशमी डोलारा

कधी भावनांचा उन्माद ,कधी शांत दीप ज्योती
कधी गुंफलेले सुवासिक विचार , कधी वावटळ गारा

कधी एक एक गळणारे मनातले हिरवे पिवळे पान
कधी मनाच्या हिरव्याकंच गालीच्यावर पाउस धारा

नागमोडी वळनावरचा प्रवास हा वेगळा सारा
तुझ्या छोट्याश्या स्पर्शाने फुलतो हा स्नेहबंध फुलोरा.

Flower Glitter Graphics - Glitterlive.com
Flower Glitter Graphics – Glitterlive.com

बंधन

Posted On फेब्रुवारी 28, 2011

Filed under चारोळी
टॅगस्: , , ,

Comments Dropped 2 responses

पुर्वी मी तुझ्या सोबत दोन पाउल चालायचे
तुझ्या मनातले उन-चांदणे सगळे समजायाचे
आता इतक्या जुन्या बंधनात कसला रे दुरावा
जवळ असून सुद्धा तू परका,मी काय समजायाचे ?

पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात

Posted On सप्टेंबर 16, 2010

Filed under pause
टॅगस्: , , ,

Comments Dropped leave a response

’प्रशांत’नं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि ’क्रांती”ला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. ’क्रांती’ने तिची साखळी जोडून पुढचा डाव ’प्राजू’,’राघव’,’जयवी’ आणि माझ्या (’गोळे काका’ यांच्या) हाती तिची सूत्रे दिली.

मी माझी साखळी जोडून, आशा जोगळेकर आणि तुषार जोशी यांना खो देत आहे.

पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, “पाऊस-कविता” पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम –

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. 🙂 आता फक्त पाऊस-कविता….

मग करायची‌ सुरुवात?

प्रशांतचे कडवं – (भुजंगप्रयात छंद)

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

प्रशाआंतचा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

क्रांतीचे उत्तर, छंद तोच, भुजंगप्रयात

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

गोळे काकांचे उत्तर, छंद तोच. भुजंगप्रयात!

नको पावसा कोसळू तू असा रे
किती घोर लावून जाशी असा रे
पुरे जाहले, ने पुढे सर्व वारे
जरा राजसा थांब आता कसा रे

.तुषार चे उत्तर छंद भुजंग प्रयात्

कुणी पावसाला म्हणे येत जारे
कुणाला सरीने सजण आठवे रे
कुणी गातसे पावसा थांब आता
अशी पावसाची अनोखीच गाथा

तुषार चा खो सई, चैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना.

माझे उत्तर. छंद तोच भुजंग प्रयात

सख्या पावसा तू असा रे कसा रे
तुला साथ देती हे उन्मत्त वारे
कधी ध्वस्त करशी जगाचा पसारा
कधी वर्षसी अमृताच्याच धारा ।

माझा खो चैताली,महक आणि शामली ला

महक चे उत्तर
कसे आवरू मी , या पाउस वेड्या मनाला
ओल्या मातीचा गंध मोहवतो त्याला
जीव कंठश्च होई,वाट पाहे क्षणा क्षणाला
लवकर येण्याचा निरोप दे, माझिया साजणाला.

shyamali che uttar

कधी सांग आता पुन्हा भेट व्हावी
तुझ्या चाहुलींनी धराही हसावी
पुन्हा त्या सयींची नको साथ आता
नको श्रावणाची बघू वाट आता

me konala kho deu?:)

http://asha-joglekar.blogspot.com/2010/09/blog-post.html

asha tai aani prashant ,khup surekh prayas,mala sandhi dilya baddal dhanyawad,ajun konala hyachyat kadwe jodayache asel tar swagat aahe.

ती तुझीच प्रीत होती

Posted On नोव्हेंबर 12, 2009

Filed under चारोळी

Comments Dropped 6 responses

इवल्याश्या पानावर ओघळला मोती
चंद्रकला उमलल्या पूनवेच्या राती
स्वर्ण अप्सरा जशी अवतरली ती
ओळखले मी, ती तुझीच प्रीत होतीimages

का निरभ्र आकाशातुन बरसले पाणी

Posted On ऑक्टोबर 25, 2009

Filed under pause

Comments Dropped 2 responses

images

का निरभ्र आकाशातुन बरसले पाणी
का रीती होऊन मनाची घागर वाही ओथम्बुनि
टवटवीत फुला सारखा हसरा दिवस आला
तरीही का वाटे उगाच उदास मनाला
इतके तरल स्वर आजूबाजूला
तरीही त्याला हवी कोणाची चाहूल ?
निश्चल ते , पुढे सरकेना
उचलण्या जड झाले रे पाउल…..

स्मृतीतल्या लाटा

Posted On सप्टेंबर 30, 2009

Filed under चारोळी
टॅगस्:

Comments Dropped one response

स्मृतीतल्या लाटा
उंच च उंच झेपावतात
पुनवेच्या चंद्राला पाहून
स्वप्नांना जगवतात

पुढील पृष्ठ »