चांदण्यात मी भीजले
डिसेंबर 19, 2007
Filed under चांदण्यात मी भीजले
टॅगस्: aaksah, चांदण्यात मी भीजले, chandani, chandra, manatla gupit, moon, nabh, nisharani
चांदण्यात मी भीजले
पोर्णिमेच्या रात्री, गोल गोल चंद्रमा हसरा, तो मंद सुगंधी वारा,खळखलणारा झरा,
प्रवाहत उतरलेली चंद्र किरणे,चांदण्यांचा शिपलेला सडा,काळ्या जर्द साडी वर
शुभ्र चमकणारे मोती लाउन आलेली निशाराणी,अशी सुंदर नटलेली रात्र,
चंद्र–चांदणीच प्रतिबिंब झर्यातल,,खूप हवी हवीशी वाटे मजला
एकटक पाहते मी त्याला,तो मला,चंद्र तो गालात लाजला.
किती दिवस झाले,दिवस म्हणण्या पेक्षा किती रात्री उलटल्या,आकाशातल्या शुभ्र
चांदन्यान कडे पाहून,चंद्रच्या नज़रेशी नज़र लाउन.
चंदेरी किरणांच्या रूपेरी वाटेवरून
आज मी पुन्हा नभात उतरले
मनातले गुपित चंद्रास सांगून
त्या शुभ्र चांदण्यात मी भीजले.
चंद्र सजना मज चोरून पाहता
गालातल्या गालात मी हसले
फुलले,बहरले आज मी लाज़ले
त्या शुभ्र चांदण्यात मी भीजले.
प्रतिक्रिया व्यक्त करा